पोस्ट्स

marathi motivation लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आधी हातपाय पसरा , अंथरूणाचं नंतर बघू ...!

इमेज
                                                                 एक म्हण आहे  ' अंथरूण पाहून हातपाय पसरावेत ! ' दुर्दैवाने प्रत्येकाने या म्हणीचा अर्थ सोयीने करून घेतला आहे. वर्षानुवर्षे हातपाय आखडून झोपायची - बसायची सवय लागली ! पण यामुळे मनात आणलं तर  हातपाय पसरू शकतात , हेच हात यशाच्या आकाशाला कवेत घेऊ शकतात , हे आम्ही विसरून गेलो. आपले पाय चालू-धावू शकतात, मनात आणलं तर तेच पाय जग जिंकू शकतात. याच पायाचं लाथेत रूपांतर करता येतं आणि लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची क्षमता असताना आपण आपले पाय अंथरुणाच्या मापाने पसरावेत, हीच शोकांतिका आहे . आपले पाय हलू शकतात, मनात आणलं तर ऑलिम्पिकमध्ये धावू शकतात आणि जिंकूही शकतात, पण आपल्या हे डोक्यातच येत नाही ! असं का होतं ?  कारण  - आपले पाय इतरांच्या डोक्याने चालतात , आणि आपली डोकी इतरांच्या पायावर टेकतात !   म्हणून डोकं नसण...

बदलांना आलिंगन द्या !

इमेज
  बदल ही एकमेव गोष्ट या जगात कधीच बदलत नाही ! भविष्य बदलण्याची आशा तुम्हाला वाटत असेल तर स्वतःला  बदलल्यावाचून पर्याय नाही. मान्य आहे, बदलायला मन लगेच तयार होणार नाही, पण स्पर्धेच्या या जलद युगात आजच्या गोष्टी उद्या जुन्या व शिळ्या झालेल्या असतात. काळाबरोबर तुमचं ज्ञान तुम्ही अपडेट ठेवता का ?  खूप लोक बदलाला घाबरतात आणि तिरस्कारसुद्धा करतात.  काही तर आमच्या काळात असं नव्हतं ,असं सांगून निसटून निघतात. मी पुन्हा पुन्हा सांगेन ,  हो ! बदल अपरिहार्य आहे.    तुम्हाला वर्तमानपेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर !   प्रत्येकजण स्वतःला मोजायचं विसरला आहे ! आपल्याला वाटतं जगात बदल घडावा, क्रांती घडावी पण आपल्याला वजा करून ! आपली शोकांतिकाच ही आहे की , शिवाजी जन्माला यावा पण माझ्या नको शेजार्‍याच्या घरात . बदलाच्या या प्रचंड वेगात आपण स्वतःला नाही बदललं तर काही दिवसांतच आपण ठिगळ लावलेल्या कपड्याप्रमाणे दिसायला लागू.   लक्षात ठेवा , स्वभावात , विचारात बदल केल्यास माणूस जर लाथ देणारा गाढव होऊ शकतो ,  तर विचारांच्या बदलाने तोच माणू...

पहिलं प्रेम...... जगण्यावर !!

इमेज
                      माझ्या स्वयंप्रेरणाच्या कार्यशाळेत भाग घेतलेल्या एका विद्यार्थ्याची छोटी गोष्ट. स्वयंप्रेरणाच्या पाच दिवसीय कार्यशाळेच्या तिसऱ्याच दिवशीचा विषय असतो-प्रेमाला प्रेरकशक्ती कसे बनवावे ? त्या दिवशीचं सत्र संपल्यावर एक 20 -21 वर्षाचा तरुण मुलगा धुमसतंच माझ्याकडे आला आणि म्हणाला.... "सर, प्रेमबिम सगळं झूट असतं,ज्या व्यक्तीवर आपण जीव ओवाळून टाकावा...स्वतःपेक्षाही ज्या नात्याला मी जपत होतो ती मुलगी अशी अचानक परकी व्हावी..? ती मला सोडून गेली याच दुःख नाही सर पण, तिने त्या बावळट, भंगारछाप काळ्या रोहनला जवळ करावं म्हणजे किती हा मूर्खपणा ... "  तो अस काही भडाभडा बोलत होता की , तिच्या विषयीचा सगळा राग , द्वेष , तिरस्कार डोळे पाणावून व्यक्त होत होता. मी शांतपणे विचारलं मग पुढे काय ? त्यावर त्याच उत्तर - सर खरं सांगू मला तर तिचा जीव घ्यावासा वाटतोय... नाहीत मी तरी...संपवाव वाटतंय सगळंच !            माझ्या तरुण मित्रांनो, ऐन उमेदीत तारुण्याच्या उंबरठ्यावर सगळं 'संपवावस' वाटणं...