बदलांना आलिंगन द्या !
बदल ही एकमेव गोष्ट या जगात कधीच बदलत नाही !
भविष्य बदलण्याची आशा तुम्हाला वाटत असेल तर स्वतःला बदलल्यावाचून पर्याय नाही. मान्य आहे, बदलायला मन लगेच तयार होणार नाही, पण स्पर्धेच्या या जलद युगात आजच्या गोष्टी उद्या जुन्या व शिळ्या झालेल्या असतात. काळाबरोबर तुमचं ज्ञान तुम्ही अपडेट ठेवता का ?
खूप लोक बदलाला घाबरतात आणि तिरस्कारसुद्धा करतात. काही तर आमच्या काळात असं नव्हतं ,असं सांगून निसटून निघतात.
मी पुन्हा पुन्हा सांगेन ,
हो ! बदल अपरिहार्य आहे.
तुम्हाला वर्तमानपेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर !
प्रत्येकजण स्वतःला मोजायचं विसरला आहे !
आपल्याला वाटतं जगात बदल घडावा, क्रांती घडावी पण आपल्याला वजा करून ! आपली शोकांतिकाच ही आहे की , शिवाजी जन्माला यावा पण माझ्या नको शेजार्याच्या घरात . बदलाच्या या प्रचंड वेगात आपण स्वतःला नाही बदललं तर काही दिवसांतच आपण ठिगळ लावलेल्या कपड्याप्रमाणे दिसायला लागू.
लक्षात ठेवा ,
स्वभावात , विचारात बदल केल्यास माणूस जर लाथ देणारा गाढव होऊ शकतो ,
तर विचारांच्या बदलाने तोच माणूस लाथ मारील तिथे पाणीसुद्धा काढू शकतो !
- दिनेश आदलिंग
लाईफ अँड बिझनेस कोच
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा