मरणारा 'पळपुटा' नसतो.
14 June , 2020 माणूस मेल्यावर दुःख होतं,हळहळतो आपण,मरणारा सेलिब्रेटी असेल तर मीडियात श्रद्धांजलीचा पूर येतो( तसा नुकताच हत्तीणीच्या मरणानेही तो आला होता)पण आपल्या अवतीभवती,आपल्या परिचयाचा कोणीतरी रोज थोडा थोडा मरत असतो हे दिसत नाही आपल्याला.बेगडी असतो आपण,आणि तेवढंच दांभिकही. खरंतर दुःखात सुख मानणं वगैरे शुद्ध मूर्खपणा असतो आणि असं कोणाला मानायला सांगणं म्हणजे मूर्खपणाचा कळस ! (कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं) दुःख हे दुःखच असतं ते दुःखाच्या ओंजळीनेच पिता येतं.आत्महत्या हा 'पळपुटेपणा' हे म्हणायला सोप्पय हो, पण जी व्यक्ती त्या टोकाला जाते,जगणं नाकारुन मरणाला कवटाळते ते नक्कीच तिच्यासाठी सोपं नसतं/नसावं.ऐकणारं,ऐकून घेणारं कोणीतरी आपलं माणूस जवळ असणं गरजेचं असतं अशावेळी.जे कोणत्याही सल्ल्याशिवाय आपली सोबत करेल आधाराचा हात देईल ! पण दुर्दैवाने खचलेल्याला अजून खचायला भाग पाडणं,त्याच्या चुका उगाळून पुन्हा- पुन्हा सांगणं,काय करायला नको होतं हे ठासून त्याच्यावर बिंबवणं यामुळे समोरची व्यक्ती आयुष्याच्या अजून ए...