आधी हातपाय पसरा , अंथरूणाचं नंतर बघू ...!
एक म्हण आहे ' अंथरूण पाहून हातपाय पसरावेत ! ' दुर्दैवाने प्रत्येकाने या म्हणीचा अर्थ सोयीने करून घेतला आहे. वर्षानुवर्षे हातपाय आखडून झोपायची - बसायची सवय लागली ! पण यामुळे मनात आणलं तर हातपाय पसरू शकतात , हेच हात यशाच्या आकाशाला कवेत घेऊ शकतात , हे आम्ही विसरून गेलो. आपले पाय चालू-धावू शकतात, मनात आणलं तर तेच पाय जग जिंकू शकतात. याच पायाचं लाथेत रूपांतर करता येतं आणि लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची क्षमता असताना आपण आपले पाय अंथरुणाच्या मापाने पसरावेत, हीच शोकांतिका आहे . आपले पाय हलू शकतात, मनात आणलं तर ऑलिम्पिकमध्ये धावू शकतात आणि जिंकूही शकतात, पण आपल्या हे डोक्यातच येत नाही ! असं का होतं ? कारण - आपले पाय इतरांच्या डोक्याने चालतात , आणि आपली डोकी इतरांच्या पायावर टेकतात ! म्हणून डोकं नसण...